मोहाडीत भरवस्तीत किराणा दुकान फोडले; १५ हजारांची रोकड लांबविली, गुन्हा दाखल

By देवेंद्र पाठक | Published: September 12, 2023 02:10 PM2023-09-12T14:10:02+5:302023-09-12T14:10:29+5:30

याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

A trusted grocery shop was broken into in Mohadi; 15 thousand cash extended, case registered | मोहाडीत भरवस्तीत किराणा दुकान फोडले; १५ हजारांची रोकड लांबविली, गुन्हा दाखल

मोहाडीत भरवस्तीत किराणा दुकान फोडले; १५ हजारांची रोकड लांबविली, गुन्हा दाखल

googlenewsNext

धुळे : भरवस्तीत चोरट्याने डाव साधत बंद असलेले किराणा दुकान फोडून गल्ल्यात असलेली १५ हजाराची रोकड चोरट्याने लांबविली. ही घटना मोहाडी उपनगरात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

किरणा दुकानदार मुरलीधर श्रीपत पाटील (वय ४३, रा. पंजाबी कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पाटील यांचे घर आणि दुकान एकाच ठिकाणी आहे. ते कुठे बाहेरगावी गेल्यामुळे त्यांनी दुकान आणि घर बंद करुन रवाना झाले. ही संधी साधून चोरट्याने डाव साधला. दुकानाला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. 

दुकानातील गल्ल्यात असलेले १५ हजाराची रोकड चोरट्याने लांबविली. दुकानातील कोणत्याही वस्तूला चोरट्याने हात लावला नाही. पैसे चोरुन चोरट्याने पळ काढला. चोरीची ही घटना शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. पाटील परिवार घरी परतल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी याप्रकरणी सोमवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश लोहार घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: A trusted grocery shop was broken into in Mohadi; 15 thousand cash extended, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.