महिलेसाेबतचा व्हिडीओ काॅल पडला ५० हजाराला, तरुण थेट पोलिसात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:18 PM2022-11-27T12:18:24+5:302022-11-27T12:19:25+5:30
याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून एका महिलेने तरुणाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकाच्या हद्दीत उघडकीला आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने तरुणाची ५० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात महिलेसह अन्य एकावर ग्रामीण पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी अज्ञात महिलेने त्याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या महिलेने स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले. तसेच पीडित तरुणालाही निर्वस्त्र होण्यास सांगून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर काही वेळाने पीडित तरुणाच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फाेन आला. या फोनद्वारे त्या तरुणाकडे पैशाची मागणी करण्यात आली.
nतुझा व्हिडीओ तयार करण्यात आलेला असून, तो यूट्यूबवर टाकतो, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर तरुणाकडे गुगल पेद्वारे ५०,५०० रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली.