खून करण्यापूर्वी सूचनाने डिसेंबरमध्ये दिलेली गोव्याला भेट; पोलीस तपासात माहिती उघड
By पूजा प्रभूगावकर | Published: January 16, 2024 01:36 PM2024-01-16T13:36:36+5:302024-01-16T13:37:00+5:30
दोन दिवसांनी पुन्हा गोव्यात येऊन केला मुलाचा खून
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा: सूचना सेठ हिने आपल्या चार वर्षीय मुलाचा खून करण्यापूर्वी गोव्याला भेट दिली होती. ३१ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी दरम्यान पाच दिवसांचा मुक्काम करुन ती बंगळूरला परतली होती. मात्र दोन दिवसांनी ती पुन्हा गोव्यात आली व मुलाचा खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली.
३१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान ती केळशी येथील एका पंचतारांकीत हॉटेलात थांबवली होती. ४ रोजी ती बंगळूरला परतला. मात्र ६ जानेवारी रोजी ती आपल्या मुलासोबत पुन्हा गोव्यात आली व कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. याच हॉटेलच्या खोलीत त्यानंतर तिने आपल्या मुलाचा खून केला मृतदेह बॅगेत भरला व ती बंगळूरला रवाना झाली.
मात्र पोलिसांनी तिला चित्रदुर्ग येथून अटक केली .दरम्यान सूचना सेंठ हिच्या पोलिस कोठडीत बाल न्यायालयाने पाच दिवसांनी वाढ केली आहे.