पुजाऱ्यासोबत पत्नीचे संबंध, पतीच्या हत्येचा कट रचला; एक डाव उलटला अन् प्लॅन फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:28 PM2023-04-18T18:28:18+5:302023-04-18T18:28:48+5:30

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

A wife killed her husband along with her boyfriend in Basti, Uttar Pradesh | पुजाऱ्यासोबत पत्नीचे संबंध, पतीच्या हत्येचा कट रचला; एक डाव उलटला अन् प्लॅन फसला

पुजाऱ्यासोबत पत्नीचे संबंध, पतीच्या हत्येचा कट रचला; एक डाव उलटला अन् प्लॅन फसला

googlenewsNext

बस्ती - उत्तर प्रदेशच्या बस्ती इथं हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. १० एप्रिल रोजी किठिउरी रेल्वे क्रॉसिंगजवळ एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पटरीवर संशयास्पदरित्या सापडला होता. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख धर्मराज नावाने झाली. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराजची हत्या फिल्मी स्टाईलने करण्यात आली होती. मृतकाच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून दगडाने पतीला बेदम मारले. इतकी मारहाण केली तो बेशुद्ध पडला. त्याचाच फायदा घेत या दोघांनी मिळून त्याला रेल्वे रुळावर फेकून दिले. जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या आहे असे लोकांना वाटावे. 

परंतु आरोपींचा प्लॅन फसला, रुळावर फेकलेल्या व्यक्तीचे ट्रेन आल्यावर हात कापले गेले परंतु तो बचावला. रेल्वे ट्रॅकवर तडफडत असलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकून स्थानिक धावत आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गंभीर अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हॉस्पिटलला पाठवले. त्याठिकाणी उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला त्यानंतर तपासाला सुरुवात केली. तपासावेळी एक एक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आणि हैराण करणारे सत्य समोर आले. 

पुजाऱ्यासोबत महिलेचे होते अनैतिक संबंध
तपासात मृत धर्मराजची पत्नी आणि मंदिरातील पुजारी यांच्यात अफेअर सुरू असल्याचे समोर आले. ही बाब पतीला समजली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने पुजाऱ्यासोबत मिळून धर्मराजचा काटा काढण्याचं ठरवले. धर्मराज गावाबाहेर कामाला जायचा. तर पत्नी पूजा करण्याच्या निमित्ताने मंदिरात जायची. त्यावेळी पुजाऱ्यासोबत तिचे सुत जुळले. धर्मराजला हे समजल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर प्लॅन रचून महिला आणि प्रियकर पुजाऱ्याने धर्मराजची हत्या करण्याचं निश्चित केले. 

पोलिसांनी केली तिघांना अटक
पोलिसांनी या गुन्ह्यात पुजारी गुड्डू, प्रेयसी मीरा आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात महिला आणि पुजाऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिला, प्रियकर पुजारी आणि त्याचा साडू याला अटक केली. 

Web Title: A wife killed her husband along with her boyfriend in Basti, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.