खासगी व्यवहारातील राहिलेले पैसे न दिल्याच्या रागातून महिलेसह एकास मारहाण
By रोहित टेके | Updated: May 8, 2023 12:35 IST2023-05-08T12:34:25+5:302023-05-08T12:35:18+5:30
कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरातील घटना, नऊ जणांवर गुन्हा, ही घटना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री घडली.

खासगी व्यवहारातील राहिलेले पैसे न दिल्याच्या रागातून महिलेसह एकास मारहाण
कोपरगाव (जि. अहमदनगर ) - खाजगी व्यवहारातील राहिलेले पैसे न दिल्याच्या रागातून नऊ जणांनी मिळून महिलेसह तिच्या मुलास शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्यासह लोखंडी गजाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री घडली.
या प्रकरणी मारहाणीत जखमी झालेल्या शंकर रतन भोसले (वय २५, रा. ४५ चारी पढेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर ) याने उपचार घेतल्यानंतर रविवारी (दि. ७) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शायरी चव्हाण, प्रविण शायरी चव्हाण, मायकल शिवराम चव्हाण, कन्हेर सतिष भोसले, आगेबाई शायरी चव्हाण, लेमनबाई शिवराम चव्हाण, रवि लाल्या भोसले, शकिला शावरी चव्हाण, गिल्या विकास भोसले ( सर्व रा. रेल्वे स्टेशन शिंगणापूर ता. कोपरगाव) या नऊ जणाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एन. शेख करीत आहेत.