व्हॉट्सअपवरून वेश्याव्यवसाय चालवायची, उल्हासनगरच्या दलाल महिलेस काशीमीरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:08 PM2023-05-11T21:08:53+5:302023-05-11T21:09:05+5:30

अल्पवयीन मुली सह तरुणीची सुटका 

A woman broker from Ulhasnagar was arrested in Kashmir for running a prostitution business on WhatsApp | व्हॉट्सअपवरून वेश्याव्यवसाय चालवायची, उल्हासनगरच्या दलाल महिलेस काशीमीरात अटक

व्हॉट्सअपवरून वेश्याव्यवसाय चालवायची, उल्हासनगरच्या दलाल महिलेस काशीमीरात अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - व्हॉट्सअप द्वारे अल्पवयीन मुली व तरुणींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायास लावणाऱ्या उल्हासनगर मधील दलाल महिलेस भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने काशीमीरा भागातून सापळा रचून अटक केली आहे .  वेश्या व्यवसाय साठी आणलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे . 

पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि , उल्हासनगर भागातील रितू नावाची वेश्या दलाल हि पुरुष ग्राहकांना व्हॉट्सअप द्वारे वेश्यागमना साठी अल्पवयीन मुली व तरुणी पुरवते . अल्पवयीन मुलींचे कौमार्यभंगसाठी ती मोठी रक्कम घेते . 

अहिरराव यांनी बोगस गिऱ्हाईक द्वारे रितू कडे विचारणा केली. त्यानुसार ती  १० मे रोजी काशीमीरा महामार्गावरील न्यू दिल्ली दरबार हॉटेल जवळ १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी व एका तरुणीला वेश्यागमना साठी घेऊन आली . अल्पवयीन मुलीचे कौमार्यभंग करण्याच्या बोलीवर मोबदला म्हणुन मोठी रक्कम ठरवुन तिने ती बोगस गि-हाईका कडुन घेताच सापळा लावून असलेले अहिरराव सह उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, शुभांगी मोकल यांनी तिला पकडले . 

तिच्या कडे चौकशी केली असता तिचे नाव कविता उर्फ रितु शंकर प्रजापती सिंग (३०) रा. उल्हासनगर असल्याचे निषपन्न झाले . तिच्या कडून रोख रक्कम सह मोबाईल आदी हस्तगत केला आहे . या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Web Title: A woman broker from Ulhasnagar was arrested in Kashmir for running a prostitution business on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.