महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2023 16:29 IST2023-04-30T16:29:02+5:302023-04-30T16:29:02+5:30
वीणा सुधाकर सुर्वणा (५२) या तक्रारादार आहेत. २७ एप्रिल रोजी चोरीची वरील घटना घडली.

महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार दाखल
- सूरज पवार
मडगाव : रेल्वे प्रवासादरम्यान एका महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रातील ठाणे येथील प्रवासी महिलेच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल व अन्य वस्तू मिळून जवळपास दहा लाख पंधरा हजारांचा ऐवज होता. गोव्यातील मडगावमध्ये ही चोरीची घटना घडली.
वीणा सुधाकर सुर्वणा (५२) या तक्रारादार आहेत. २७ एप्रिल रोजी चोरीची वरील घटना घडली. तक्रारदार रेल्वे क्रमांक १२१३४ मंगळुरु मुंबई एक्सप्रेसच्या बी २ कोचमधून प्रवास करीत होत्या. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरुन रेल्वे सुटल्यानंतर चोरीची ही घटना घडली.
सांयकाळी साडेसातच्या दरम्यान चोरीची वरील घटना घडली.साधारणात: २५ ते ३० वयोगटातील एक अज्ञात युवकाने महिलेची पर्स चोरली. भादंसंच्या ३५६ व ३७९ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरिक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.