सॉफ्टवेअर इंजनिअर महिलेला टास्क पडला ३० लाखांना; केरळमधून दोघांना बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: January 31, 2024 11:29 AM2024-01-31T11:29:51+5:302024-01-31T11:29:59+5:30
सायबर पोलिसांची कारवाई
मुंबई : सॉफ्टवेअर इंजनिअर महिलेला टास्क फ्रॉडचा जाळ्यात ओढून ३० लाखाना गंडविणाऱ्या टोळीतील दुकलीला केरळ मधून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अब्दुल वाहिद कबीर (२५) आणि रिझवान मुनीर (२५) अशी अटक आरोपींची नावे आहे.
मुंबईतील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेला व्हॉट्सॲपवर हॉटेल रेटिंग बाबत जॉब ची माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनी लिंकवर क्लिक करत हॉटेल रेटिंग देताच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. सावज जाळ्यात येताच ठगानी टास्क जॉब ची ऑफर दिली. महिलेने विश्व ठेवून गुंतवणूक केली. यामध्ये ३० लाख गमावल्यानंतर आरोपी नॉट रीचबल झाले. तसेच ग्रुप मधूनही त्यांना काढण्यात आले.
अखेर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. अखेर सायबर विभागाकडे प्रकरण येताच त्यांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे तसेच बँक व्यवहाराच्या माहितीतून पोलीस दोघांपर्यंत पोहचले. यामध्ये जवळपास ३५ व्यवहारात महिलेने हे पैसे गमावले होते. यापैकी ५९ हजार वाचवण्यात पोलिसांना यश आले. कबीर हा गारमेंट चा व्यवसाय करत असल्याचे सांगितले तर रिझवान मेकनिकल इंजिनियरिंग केले आहे.
१६ बँक खात्याचा तपास सुरू
पोलिसांकडून १६ बँक खात्याचा तपास सुरू आहे. यापैकी एक बँक खाते रिझवानचे निघाले. अब्दुल बँकेतून पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागताच त्यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे