बाळचोर समजून महिलेला बेदम मारहाण; मालाडच्या मालवणी परिसरातील प्रकार

By गौरी टेंबकर | Published: September 18, 2022 10:54 PM2022-09-18T22:54:23+5:302022-09-18T22:54:47+5:30

लोकमत न्यूज  मुंबई: बाळचोर समजून एका महिलेला स्थानिकांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार मालवणी परिसरात शनिवारी रात्री घडला. ती महिला ...

A woman was brutally beaten as a child thief in Malvani area of Malad | बाळचोर समजून महिलेला बेदम मारहाण; मालाडच्या मालवणी परिसरातील प्रकार

बाळचोर समजून महिलेला बेदम मारहाण; मालाडच्या मालवणी परिसरातील प्रकार

googlenewsNext

लोकमत न्यूज 

मुंबई: बाळचोर समजून एका महिलेला स्थानिकांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार मालवणी परिसरात शनिवारी रात्री घडला. ती महिला गतिमंद असल्याचे  उघड झाल्यावर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मालवणीच्या गेट क्रमांक ६ याठिकाणी रात्री साडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. ही महिला याठिकाणी फिरताना स्थानिकांना दिसली. तिच्या संशयीत हालचाली वरून नागरिकांना ती बाळ चोरी करण्यासाठी आली आहे असे वाटले. त्यामुळे स्थानिक महिलांनी तिला पकडुन हाणामारी करण्यास सुरवात केली. हात जोडत मी बाळ चोर नाही असे वारंवार सांगून देखील तिच्याकडे जाब विचारणे आणि तिचे व्हिडियो रेकॉर्डिंग करण्याचा प्रकार सुरू होता. काही महिला बोल किती मुले पळवलीस, मुलांना कुठे ठेवलेस असे विचारत श्रीमुखात भडकावण्याचाही प्रकार घडला. इतकेच नव्हे तर बच्चा चोर म्हणत तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. ते पाहून तिला ओळखणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत ती गतीमंद असल्याचे अन्य लोकांना सांगितले. त्यानंतर तिला मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: A woman was brutally beaten as a child thief in Malvani area of Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.