महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गटारात आढळला, पोलीस तपास सुरू

By नितीन पंडित | Published: July 27, 2022 08:34 PM2022-07-27T20:34:11+5:302022-07-27T20:37:17+5:30

Murder Case : भिवंडीत अज्ञात महिलेची हत्या

A woman's body was found wrapped in a blanket in a drain, police are investigating | महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गटारात आढळला, पोलीस तपास सुरू

महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गटारात आढळला, पोलीस तपास सुरू

Next

नितिन पंडीत

भिवंडी - वळपाडा येथे एका ३० ते ३५ वर्षीय अनोखाळ्या महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत मंगळवारी गटारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील एका मोठ्या गटारात हा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 
         

वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील दोन इमारतीच्या गोदामामध्ये मोठे गटार आहे. या गटारीच्या बाजूला मंगळवारी गावातील एका प्लंबरला महिलेचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याने या घटनेची माहिती वळपाडा गावच्या पोलीस पाटील सुनंदा पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी नारपोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.या हत्ये प्रकरणी बुधवारी पहाटे पोलीस पाटील यांच्या फिर्यादिवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) राजेश वाघमारे करीत आहेत.
           

या महिलेची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच महिलेची ओळख पटणार असून मयत महिलेची ओळख पटल्यास लवकरात लवकर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील त्यासंदर्भातील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.

Web Title: A woman's body was found wrapped in a blanket in a drain, police are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.