जामिनावर सुटलेल्या तरुणाचा 70 वर्षीय महिलेवर दुसऱ्यांदा अत्याचार; याच प्रकरणाग झालेली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:17 IST2024-12-24T19:14:37+5:302024-12-24T19:17:52+5:30
गुजरातच्या भरुचमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

जामिनावर सुटलेल्या तरुणाचा 70 वर्षीय महिलेवर दुसऱ्यांदा अत्याचार; याच प्रकरणाग झालेली शिक्षा
Gujarat Crime: गुजरातच्या भरुचमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जामिनावर सुटलेल्या 35 वर्षीय तरुणाने 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, आरोपी याच प्रकरणाच तुरुंगात गेला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधील भरूच जिल्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाने वृद्ध महिलेवर बलात्कार केला. या तरुणाने यापूर्वीही याच महिलेचा लैंगिक छळ केला होता, ज्यामुळे तो तुरुंगात होता. आता जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने परत त्याच महिलेला आपले भक्ष्य बनवले. पोलिस उपअधीक्षक पी.एल. चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, आरोपी शैलेश राठोड याने 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर रोजी वृद्ध महिलेवर शेतातील झोपडीत अत्याचार केला. आरोपीने महिलेला धमकावत हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. मात्र, महिलेने पोलिसांची मदत घेत आमोद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर याच महिलेवर 18 महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा त्याच महिलेवर बलात्कार केला.