राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला, गुन्हा दाखल
By मनीषा म्हात्रे | Published: September 12, 2022 08:40 PM2022-09-12T20:40:40+5:302022-09-12T20:41:11+5:30
मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय रिझवान अहमद मोहरम अली खान याने वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबई गाठली.
मुंबई : गोवंडीत राहत्या घरातच मोबाईल चोरीसाठी तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिझवान अहमद मोहरम अली खान (२२) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मूळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय रिझवान अहमद मोहरम अली खान याने वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबई गाठली. दीड महिन्यापासून गोवंडी परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे तो राहण्यास आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घरात असताना एक अनोळखी तरुण तेथे आला. त्याने, रिझवानकडे मोबाईलची मागणी केली. रिझवानने नकार दिला. त्याने, "मेरा नाम कासीम है, तू मूझे नही पहचानता, मोबाईल नही दिया तो तुझे जान से मार दूंगा अशी धमकी दिली. त्याने तरीही मोबाईल न दिल्याने त्याच्या त्याच्या मांडीवर चाकूने वार करत मोबाईल घेऊन पसार झाला. त्याने, चोर म्हणून ओरडताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याचेकडे असलेल्या चाकूने त्याने स्वताच्या हातावर व अंगावर जखमा करून घेतल्या. स्थानिकांच्या मदतीने रिझवानला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी लागताच शिवाजी नगर पोलिसांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी कासीम विरोधात गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.