विद्यार्थिनीचा गळा चिरणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:24 AM2023-10-07T10:24:27+5:302023-10-07T10:25:15+5:30

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गभालपाडा आश्रमशाळा आहे.

A young man who slit the throat of a student commits suicide by hanging himself | विद्यार्थिनीचा गळा चिरणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या 

विद्यार्थिनीचा गळा चिरणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या 

googlenewsNext

रवींद्र साळवे

मोखाडा : प्रेमसंबंधातून तरुणीचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  गभालपाडा आश्रमशाळेत 12वीत शिकणाऱ्या अर्चना उदार (18) या तरुणीची शुक्रवारी 6 तारखेला, भरदिवसा प्रेमप्रकरणातून धारधार कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यानंतर आरोपी प्रभाकर वाघेरा (22) हा फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना, त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅमवर पाणी सोडण्यात  येणाऱ्या लोखंडी गेटला  रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबतची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली.

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक  गभालपाडा आश्रमशाळा आहे. ही मोखाडा शहराच्या ठिकाणी आहे. या आश्रमशाळेत वर्ग खोल्या कमी असल्याकारणाने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीचे विद्यार्थी दररोज चालत  जातात. मात्र अशावेळी घोळक्यानी किंवा शिक्षक यांच्यासोबत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना, निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच आरोपी प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. मोखाड्यात गुन्हेगारीचा लवलेशही नसताना भरदिवसा तरुणीचा खून होतो, ही घटना वेदनादायी असून या घटनेने आश्रमशाळेतील मुलांचा सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: A young man who slit the throat of a student commits suicide by hanging himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.