पुण्यात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हत्या, तर एका तरुणावर गोळीबार, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:21 AM2023-11-20T10:21:51+5:302023-11-20T10:22:53+5:30

किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

a youth was killed by two persons in ganesh peth, while a youth was shot at baner area incident in pune | पुण्यात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हत्या, तर एका तरुणावर गोळीबार, परिसरात खळबळ

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हत्या, तर एका तरुणावर गोळीबार, परिसरात खळबळ

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अशातच पुन्हा एखदा पुण्यात मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पाहायला मिळाला. पुण्यातील गणेश पेठेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. तर दुसरीकडे किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे.  

पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार 
किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला आहे.  हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला.पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा एक जिवंत राऊंड आणि दोन  केसेस जप्त केल्या आहेत. 

Web Title: a youth was killed by two persons in ganesh peth, while a youth was shot at baner area incident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.