वाळू उपसा केल्याच्या वादातून कान्हरवाडीत तरुणाचा खून, ६ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 03:25 PM2023-06-04T15:25:03+5:302023-06-04T15:25:45+5:30
दोन सख्या भावांवर हल्ला, अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना
कडेगाव-सांगली: कान्हरवाडी तालुका कडेगाव येथे घडली आहे. ही थरारक घटना शनिवार दिनांक ३ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.सचिन हणमंत मदने (वय ३२ रा.कान्हरवाडी ता.कडेगाव )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खंडू हणमंत मदने (वय ३५) वर्षे हा गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी लक्ष्मण जगन्नाथ मदने,किरण लक्ष्मण मदने, सुरज संजय मदने,सौरभ संजय मदने ,करण गुलाब पाटोळे,महेंद्र बबन पाटोळे सर्व राहणार कान्हारवाडी तालुका कडेगाव या सहा जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कान्हारवाडी येथील सचिन हणमंत मदने (वय ३२) व खंडू हणमंत मदने (वय ३५) या दोघा भावांनी येरळा नदीपात्रातुन वाळूची खेप भरून आणली.या कारणावरून संशयित आरोपींनी शनिवारी रात्री १० च्या सुमारास कान्हारवाडी हद्दीत येतगाव रस्त्यावलगतच्या शेताजवळ हातात धारदार हत्यारे घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी संशयित आरोपी सुरज संजय मदने याने त्याच्या हातातील तलवारीने व किरण लक्ष्मण मदने याने त्याच्या हातातील चाकूने सचिन हणमंत मदने यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पाठीवर वार केले.
यावेळी लक्ष्मण जगन्नाथ मदने याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने खंडू जगन्नाथ मदने यांचे खांद्यावर व पायावर वार केले.यावेळी सौरभ संजय मदने ,करण गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे यांनी हातातील लोखंडी गजाने तसेच लाकडी दांडक्याने सचिन व खंडू यांना मारहाण केली.यामुळे सचिन हणमंत मदने (वय ३२) याचा औषधोपचारापूर्वीच मृत्यू झाला. खंडू हणमंत मदने हा गंभीर जखमी झाला आहे. सपोनि संतोष गोसावी अधिक तपास करीत आहेत.