अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:18 AM2020-03-14T06:18:03+5:302020-03-14T06:18:10+5:30

बहिणीवर सख्ख्या भावानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Abduction of minor girl by torture | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

Next

नालासोपारा : वसई पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून स्वत:च्या घरी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी तक्रार दिल्यावर पोलिसांनी बलात्कार, अपहरण, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वसईच्या पूर्वेकडील परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी २५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान आत्याच्या घरी एकटी असताना आरोपी त्या ठिकाणी
आला. आरोपीने तिला तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत लग्न कर, असे सांगितले, मात्र तिने त्याला नकार दिला. तरीही आरोपीने तिचा हात पकडून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. या प्रकरणी गुरुवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भावाचा अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
बहिणीवर सख्ख्या भावानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून भावाला अटक केली आहे. नायगावच्या परिसरात राहणाºया १६ वर्षांच्या अल्पवयीन बहिणीवर भावाने आई-वडील गावाला गेल्यावर सप्टेंबर २०१९पासून बलात्कार केला आहे.

आई-वडिलांना याबाबत काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार केले. शेवटी कंटाळून तिने गुरुवारी संध्याकाळी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abduction of minor girl by torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.