अल्पवयीन मुलीचे अपहरण; तीन महिने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 01:42 IST2023-08-31T01:42:21+5:302023-08-31T01:42:33+5:30
मुलीची देवरिया येथून २६ ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली, तर मंगळवारी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

अल्पवयीन मुलीचे अपहरण; तीन महिने बलात्कार
बलिया (उप्र) : येथील एका व्यक्तीने १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. मुलीची देवरिया येथून २६ ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली, तर मंगळवारी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.
२९ मे रोजी ही मुलगी आईसोबत बलिया शहरातील कोतवाली भागातील न्यायालयात गेली होती. पीडितेला त्याच गावातील मार्कंडेय यादव उर्फ सोनू याने आमिष दाखवून पळवून नेले, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ (अपहरण) अंतर्गत गेल्यावर्षी २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना दिलेल्या निवेदनात तरुणीने सांगितले की, यादवने तिचे अपहरण केले आणि तिला देवरिया येथे नेले. तेथे त्याने जवळपास तीन महिने तिच्यावर बलात्कार केला.