मजूर कुटुंबातील दिव्यांग युवतीवर अत्याचार; आरोपीस आजन्म कारावास

By निलेश जोशी | Published: August 30, 2022 07:01 PM2022-08-30T19:01:23+5:302022-08-30T19:02:29+5:30

बुलढाणा न्यायालयाचा निकाल: ११ साक्षी धरल्या महत्त्वपूर्ण

Abuse of a disabled girl; Life imprisonment for the accused by buldhana court | मजूर कुटुंबातील दिव्यांग युवतीवर अत्याचार; आरोपीस आजन्म कारावास

मजूर कुटुंबातील दिव्यांग युवतीवर अत्याचार; आरोपीस आजन्म कारावास

googlenewsNext

बुलढाणा : दिव्यांग युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील एकास आजन्म कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. देऊळगाव राजा पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या एका गावात २१ वर्षीय दिव्यांग युवती ही घरी एकटीच असताना आरोपी दिलीप संपत भालेराव (रा. निमगाव गुरू) याने पीडितेवर अत्याचार केला. तिची आई मजुरीच्या कामाने बाहेर गेलेली असताना आरोपीने ही संधी साधत अत्याचार केला होता. १८ जुलै २०२१ रोजी ही घटना घडली होती. 

दुपारी चार वाजता पीडित दिव्यांग मुलीची आई शेतातून घरी परत आली असता आरोपी हा पीडितेच्या बाथरूममध्ये गेला असल्याची माहिती पीडितेच्या आईला तिच्या नातेवाईकांकडून मिळाली. तेव्हा त्वरित घरी जाऊन त्यांनी पहाले असता आरोपी दिलीप संपत भालेराव पीडितेवर अतिप्रसंग करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दिलीप भालेराव याने तेथून पळ काढला. सायंकाळ झाल्यामुळे त्या दिवशी या घटनेची पोलिसात तक्रार देता आली नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाअंती न्यायालयत दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात दिव्यांगतेच्या संदर्भाने वैद्यकीय अधिकारी, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुशील चव्हआम, मानसिक विकलांगतेच्या अनुषंगाने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पाटोळे, डॉ. किरण रगडे, पंचसाक्षीदार संतोष सरकटे व पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांच्या साक्षी सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरल्या. वादी पक्षाच्या वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांचा प्रभावी युक्तीवाद पहाता जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहरे यांनी आरोपी दिलीप संपत भालेराव यास दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आजन्म कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा २९ ऑगस्ट रोजी सुनावली. या प्रकरणात वादी पक्षाच्या विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. सोनाली सावजी यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील साळवे यांनी सहकार्य केले.

पीडिता दिव्यांग असल्याने नोंदवला नाही जबाब

प्रकरणातील पीडिता ही १०० टक्के दिव्यांग असल्याने जबाब देण्यास ती सक्षम नसल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नाही. सोबतच या प्रकरणाती दोन प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या महिलांनी वेळेवर साक्ष फिरवलेली असताना पीडितेची आई, वैद्यकीय अहवाल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष घटनेला पुरक व सुसंगत तथा विश्वासहार्य असल्याने तथा सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी यांनी प्रभावी युक्तीवाद पहात वैद्यकी अधिकारी यांचा पुरवा देखील न्यायालयाने नोंदविला होता.
 

Web Title: Abuse of a disabled girl; Life imprisonment for the accused by buldhana court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.