लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; गर्भपात करून दिला लग्नाला नकार
By सागर दुबे | Published: March 13, 2023 08:42 PM2023-03-13T20:42:10+5:302023-03-13T20:44:38+5:30
१८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह येथे वास्तव्याला आहे. तरुणीची एरंडोल येथील एका तरुणाशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यानंतर लग्नाचे आमिष देत तरूणाने तरूणीसोबत तिच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी अत्याचार केले.
जळगाव : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर दोन वर्षांपासून अत्याचार करून गर्भवती केले आणि नंतर तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणासह त्याचे आई व वडीलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
१८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह येथे वास्तव्याला आहे. तरुणीची एरंडोल येथील एका तरुणाशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यानंतर लग्नाचे आमिष देत तरूणाने तरूणीसोबत तिच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी अत्याचार केले. यादरम्यान तरूणीच्या कुटुंबियांना ही बाब माहित पडल्यानंतर त्यांनी तरूणाला लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने आई वडील तयार नसल्याचे सांगत टाळाटाळ केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल सुध्दा झाला होता. नंतर त्याला अटकही करण्यात आली होती.
गुन्हा माघे घ्या, लग्न लाऊन देऊ -
दरम्यान, तरूणाला अटक झाल्यानंतर त्याच्या आई वडीलांनी मुलीच्या कुटुंबियांना गुन्हा मागे घ्यावयास सांगत, त्याला जेलमधून बाहेर येवू द्या मग दोघांचे लग्न लावून देवू असे आश्वासन दिले. मात्र यानंतरही पुढे त्यांनी वेळ मारुन नेली. २०२२ मध्ये पुन्हा तरूण हा बाहेर आल्यानंतर मुलीला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. याच अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. तरूणासह त्याच्या आईने पिडित मुलीला पपई तसेच कॉफी खावू घालून तिचा गर्भपात केला.
लग्नाच्या दिवशी दिला नकार.... -
गर्भपात केल्याची माहिती मुलीने तिच्या वडीलांनी दिली. तिच्या वडीलांनी तरूणाच्या आई-वडीलांना संपर्क साधून त्यांना त्यांच्या घरी बोलवून घेतले. गर्भपाताबाबत विचारल्यानंतर तरूणाच्या कुटूंबियांनी १२ मार्च रोजी लग्न करून देवू असे सांगून पत्रिका छापण्यास सांगितल्या. तरुणीच्या वडीलांनी लग्नाची तयारी केली, मात्र लग्नाच्या दिवशी तरूणाने थेट तरुणीच्या वडीलांना लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर तरुणीला सोबत घेत तिच्या वडीलांना रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी रात्री ११ वाजता संशयित तरूणासह त्याच्या आई-वडीलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.