दिव्यांग महिलेवर अत्याचार; संशयित आराेपीला काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: September 4, 2022 09:59 PM2022-09-04T21:59:37+5:302022-09-04T22:02:27+5:30
लातूर जिल्ह्यातील गातेगाव हद्दीतील घटना
लातूर : दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याची घटना गातेगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत गुन्हा दाखल केला असून, आराेपीला अटक केली आहे. त्याला लातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. दरम्यान, याबाबत गातेगाव पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आराेप नातेवाइकांनी केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील गातेगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. पीडित महिला ही कर्णबधिर आणि मूकबधिर आहे. तिच्या असहायतेचा फायदा घेत गावातीलच एका संशयिताने तिच्यावर ३१ ऑगस्ट राेजी अत्याचार केले. तर याच संशयिताने अत्याचाराच्या घटनेपूर्वी चार-पाच दिवस अगाेदर अन्य एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर पीडित महिला आपल्या नातेवाइकासह गातेगाव पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली हाेती. दरम्यान, गातेगाव पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचा आराेप नातेवाइकांनी केला आहे. तर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे अखेर एका संशयितावर १ सप्टेंबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची काेठडी सुनावली आहे.
घटनास्थळी लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सुनील गाेसावी, गातेगाव पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक अशाेक घारगे, पाेलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक किशाेर कांबळे करत आहेत.