लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला; पावणेतीन लाखाला गंडाही घातला
By विलास जळकोटकर | Published: January 12, 2024 06:07 PM2024-01-12T18:07:47+5:302024-01-12T18:08:00+5:30
पिडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
सोलापूर : पतीचं निधन झालेल्या महिलेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. तिच्यावर अत्याचार केला. कालांतरानं एकत्र राहताना वाहनखरेदीसाठी म्हणून २ लाख ७० हजार रुपये घेऊन पसार झाल्याची तक्रार पिडित महिलेने जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार ५ ऑगष्ट २०२१ या काळात घडल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीनुसार गणेश रामचंद्र चिमुकले (रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे गुन्हा नोंदलेल्याचे व्यक्तीचं नाव आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडित महिला सन २००२ पासून पतीसमवेत शहरातल्या एका परिसरात राहत होती. आठ वर्षांनी पतीचं निधन झाल्यानं दुसरीकडे राहण्यास गेली. या काळात तिचे वरील व्यक्तीची ओळख झाली. त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवून विश्वास संपादन केला.
घटनेच्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट २०२१ या दिवशी रात्रीच्या सुमारास त्यानं पिडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील अनेक दिवस त्यांचे फोनवर संभाषण होत होते. जानेवारी २०२३ मध्ये शहरातल्या एका भागात ते पती-पत्नी असल्याचे सांगून एकत्र राहिले. अधून-मधून तो येत असे. या काळात त्याने पिडितेला स्वत:चे पिकअप घेऊन स्वत:चा बिझनेस सुरु करु. संसार करुन अशी मोहिने पिडितेवर घातली. बचत गटाकडून १ लाख ७० हजार व नातलगाकडून १ लाख काढायला लावले. त्यानंतर तो परत आलाच नाही, असे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि जाधव करीत आहेत.