मुलीवर अत्याचार केले, मग तिच्याच घरी फोन करुन भलतेच सांगितले; चहा घेताना पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:06 PM2022-12-28T22:06:28+5:302022-12-28T22:07:03+5:30

आरोपीने एका शालेय शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली.

Abused the girl, then called her home and told her badly; Caught taking tea! | मुलीवर अत्याचार केले, मग तिच्याच घरी फोन करुन भलतेच सांगितले; चहा घेताना पकडले!

मुलीवर अत्याचार केले, मग तिच्याच घरी फोन करुन भलतेच सांगितले; चहा घेताना पकडले!

googlenewsNext

इन्स्टाग्रामवर मैत्री करून १३ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी मंगळवेढा येथून रविवारी सकाळी १० वाजता चहा पीत असतानाच ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज राजकुमार वाघमारे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) याने एका शालेय शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. तिला वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे सांगितले. तिला इन्स्टाग्रामवर अनेक मेसेज चॅटिंग करून फूस लावली. तिला १४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे बोलावून तेथून कोल्हापूर येथे नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या घरच्यांना तुमची मुलगी घर सोडून जाताना मला सापडली असे सांगितले. तुम्ही तिला घ्यायला या, असे फोन करून सांगितले त्या मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिले. दोन-तीन दिवसांनंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. 

सदर प्रकरणानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून योगीराज वाघमारे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पोउपनि प्रशांत भागवत त्याच्या शोधात होते. तो मंगळवेढा येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी तत्काळ मंगळवेढा गाठले. योगीराज चहा पीत बसल्याचे त्यांना आढळून आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Abused the girl, then called her home and told her badly; Caught taking tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.