अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप आमदारला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:07 PM2023-12-15T16:07:54+5:302023-12-15T16:08:25+5:30

अल्पवयीन मुलीवर सहावेळी अत्याचार केल्याप्रकरणी कोर्टाने आमदाराला शिक्षा सुनावली आहे.

Abusing a minor girl; BJP MLA sentenced to 25 years in jail | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप आमदारला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप आमदारला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सोनभद्र: उत्तर प्रदेशातील सोनभद्र खासदार/आमदारन्यायालयाने दुधी येथील भाजप आमदार रामदुलारे गोंड यांना (MLA Ramdulare Gond) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 12 डिसेंबर रोजी न्यायालयाने आमदाराला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून तुरुंगात पाठवले होते. आता दोषी ठरल्यानंतर त्यांना आमदारकी गमवावी लागणार, हे निश्चित आहे.

हे प्रकरण 2024 मधील आहे. पॉक्सो आणि बलात्कार प्रकरणाची सुनावणी 4 नोव्हेंबर 2014 पासून सुरू होती. या प्रकरणी न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी आमदाराला आयपीसीच्या कलम 376 आणि 201 अंतर्गत दोषी घोषित केले होते. विशेष म्हणजे, आरोपीने पीडितेचे बनावट शाळेचे प्रमाणपत्र बनवून तिची जन्मतारीख वाढवली आणि तिला प्रौढ दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

नऊ वर्षांपासून सुरू होती सुनावणी
2014 मध्ये रामदुलारे गोंडवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप झाला होता. यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि 9 वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर निकाल आला. विशेष म्हणजे, बलात्कारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली आणि वर्षभरानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. पीडितेच्या भावाने सांगितले की, या 9 वर्षांच्या लढ्यात आमदाराकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आणि विविध प्रलोभनेही देण्यात आली. आता निकाल जाहीर होताच पीडितेच्या भावाने आनंद व्यक्त केला. 


 

Web Title: Abusing a minor girl; BJP MLA sentenced to 25 years in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.