देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:33 IST2020-06-10T17:28:15+5:302020-06-10T17:33:09+5:30
पोलिसांनी यासंदर्भात अदखपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्रार मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली असून संबंधितांवर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही भाडोत्री लोकांकडून प्रतिष्ठित व्यक्तीविरूद्ध शिवीगाळ, अपमानास्पद भाषा वापरून बदनामी केली जाते. अशा वाईट प्रवृत्तीना आळा व्हावा यासाठी कठोर कारवाई केली जावी , अशी मागणी भारतीय यांनी तक्रारीतून केली आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि बदनामी करण्याचे षडयंत्र काही व्यक्तींकडून सुरु होते. पोलिसांनी यासंदर्भात अदखपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्रार मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली आहे.
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2020
खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार
खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही