जन्म दाखल्यासाठी लाच घेताना लिपिकास एसीबीने घातल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 07:13 PM2020-01-03T19:13:45+5:302020-01-03T19:16:16+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.
मीरारोड - जन्माची नोंद नसल्याने त्याचा दाखला काढण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकास ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ४२ वर्षीय तक्रारदार यांना त्यांचा जन्माचा दाखला महापालिकेतून हवा होता. परंतु त्यांच्या जन्माची नोंद नसल्याने दाखला मिळण्यासाठी कोर्टातून प्रक्रिया करून दाखला मिळवावा लागतो.
सदर प्रकरणी दाखला मिळवून देण्यासाठी पालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील लिपिक तथा प्रभारी उपनिबंधक नितीन मानसिंग राठोड (४९) रा. वज्रेश्ववरी बिल्डिंग, विरार यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणी ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती व पथकाने खात्री पटल्यावर आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मुख्यालयात राठोड याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.