बिल्डरकडून लाच उकळणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकाला एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 21:20 IST2020-11-06T21:19:55+5:302020-11-06T21:20:27+5:30
Bribe Case : वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट ह्या इमारतीमधील दोन गाळ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधकांनी 30 हजाराची लाच फिर्यादीकडे मागितली.

बिल्डरकडून लाच उकळणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकाला एसीबीने केली अटक
पालघर - वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांच्या इमारत गाळ्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजाराची लाच मागितल्य प्रकरणी सर्जेराव अभिमान चाटे (36) ह्या प्रभारी दुय्यम निबंधकाला पालघरच्या लाचलुचपत प्रबंधक विभागाने अटक केली.
वाडा येथील एका बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट ह्या इमारतीमधील दोन गाळ्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधकांनी 30 हजाराची लाच फिर्यादीकडे मागितली. या ओरकरणाची तक्रार फिर्यादी ह्यांनी पालघरचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक के एस हेगाजे ह्यांच्या कडे केली.तडजोडी अंती 20 हजारावर व्यवहार ठरल्यानंतर आज संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी तक्रारदार ह्यांच्याकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना आरोपी सर्जेराव चाटे ह्याला अटक करण्यात आली.