ACB च्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यावर उगारला हात, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: March 12, 2023 03:59 PM2023-03-12T15:59:49+5:302023-03-12T16:02:14+5:30
शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनकांबळे हा लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे आला.
सोलापूर - माझ्या अर्जाचे काय झाले असे विचारत, सांगली येथील भुमीअभिलेख विभागातील अशोक सिद्राम सोनकांबळे याने लाचलुचपत प्रतिबंध विभागात जाऊन तेथील कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेला. या प्रकरणी हवालदार रशिद बोणवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनकांबळे याच्यावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनकांबळे हा लाच लूचपत प्रतिबंधक विभाग येथे आला. तेथे येऊन फिर्यादी बाणेवाले हे काम करत असताना कार्यालयात येऊन मोठ मोठ्याने ओरडून तुझ्याकडे दिलेल्या अर्जाचे काय झाले, तु मला लेखी दे म्हणत आरडा ओरड करू लागला. तेथील रजिस्टर टेबलावरून फेकत तुला बघून घेतो, खोटी केस करतो अशी धमकी देत शर्टाची गच्ची धरून अंगावर हात उगारला. शिवाय शिवीगाळ केली, अशा आशयाची फिर्याद बाणेवाले यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून अशोक सिद्राम सोनकांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई माळी करत आहेत.