मुंबईत 'क्लास वन' अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड; ACB ची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 23:50 IST2022-01-05T23:49:29+5:302022-01-05T23:50:24+5:30
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकलेले वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) यांच्या घरातून कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे.

मुंबईत 'क्लास वन' अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड; ACB ची धडक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकलेले वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) यांच्या घरातून कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे. त्यांच्या घर, कार्यालयातून १ कोटी ६१ लाख ३८ हजार किंमतीचे ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८१ लाखांची रोख रककमेचा समावेश आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अँँकॅडमी मध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अँँकॅडमी व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून २०२१ मध्ये पूर्व मंजुरी प्राप्त झाली. याप्रकरणात अंतिम मंजुरी करता जाधव याने पाच लाखांची मागणी केली. मंगळवाऱी पाच लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एसीबी अधिक तपास करत आहेत.
एसीबीने त्यांच्या घर, कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे. यामध्ये घरात एक किलो ५७२ ग्रँम सोने, आणि ७९ लाख ४६ हजार रूपयांची रोकड़ मिळून आली आहे. तर कार्यालयातून २ लाख २८ हजार रूपयांची रोकड़ जप्त करण्यात आली आहे. दागिने, आणि रोकड़ जप्त करत अधिक तपास करत असल्याचे एसीबीने सांगितले आहे. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तेबाबतही अधिक चौकशी सुरु आहे.