भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:35 PM2022-05-19T17:35:00+5:302022-05-19T18:58:48+5:30

ACB Action on former BJP MLA Narendra Mehta : मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांच्यासह दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACB takes action against former BJP MLA Narendra Mehta | भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती

Next

अवैद्य पद्धतीने कोट्यवधीची मालमत्ता जमवल्याप्रकरणी भाजपाचे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून कारवाई करण्यात आली आहे. मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांच्यासह दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराची झडती सुरू आहे. 

नगरसेवक व आमदार पदावर असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरोपयोग करून त्यांच्या उत्पन्नपेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ इतक्या रक्कमेची असंपदा जमवल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर ठाणो एसीबीने कारवाई केली असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागामाच्या दोन पथकाकडून नरेंद्र मेहतांच्या घर आणि कार्यालयात गुरुवारी दिवसभर तपासणी सुरू होती.
        

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकसेवक पदाचा दुरु पयोग करून बेनामी संपत्ती गोळा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ही चौकशी सुरू होती. एसीबी पथकाची ही चौकशी पूर्ण झाली असून या प्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहतांवर गुरु वारी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. जानेवारी २००६ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत नगरसेवक व आमदार पदावर असताना अधिकाराचा आणि पदाचा दुरु पयोग करून त्यांच्या उत्पन्नपेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये इतक्या रकमेची असंपदा जमवल्याचे एसीबीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, ठाणे एसीबीच्या दोन वेगवेगळ्या पथकाकडून मेहतांच्या घर व कार्यालयावर गुरु वारी धाड टाकून तपासणी करण्यात आली. हे सर्च ऑपेरशन गुरुवारी रात्री र्पयत सुरु होते. परंतु त्यांच्या हाती काही महत्वाचे दागे दोरे लागले का? याची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: ACB takes action against former BJP MLA Narendra Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.