मंत्रालयात एसीबीने रचला सापळा; लाचखोर लिपिकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:27 PM2019-10-06T21:27:06+5:302019-10-06T21:28:20+5:30
लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
मुंबई - मंत्रालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सापळा रचून एका लाचखोर कनिष्ठ लिपिकास अटक केली आहे. मंत्रालयातील या कनिष्ठ लिपिकाचे नाव अविनाश गलांडे असं असून त्याला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
अविनाश गलांडे हा आरोपी मंत्रालयातील गृहविभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. फिर्यादी यांनी स्वतःच्या नावे शस्त्र परवान्यासाठी २८ ऑगस्ट २०१९ ला गृह विभागात अपील अर्ज सादर केला होता. अपील अर्जावर लवकरत लवकर कार्यवाही व्हावी म्हणून २९ ऑगस्ट २०९ ला गलांडे यांनी फिर्यादी यांच्याकडे ५ हजार लाच मागितली. त्यांनतर फिर्यादीने लाचेची रक्कम न दिल्याने वारंवार मोबाईलवर फोन करून लाचेची रक्कम मागितली. २ ऑक्टोबरला फिर्यादीच्या व्हॅट्स ऍपवर मेसेज पाठवून ३ ऑक्टबरला भेटायला बोलावले. लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने याची तक्रार एसीबीकडे केली आणि एसीबीने सापळा रचून आरोपी गलांडेला रंगेहाथ अटक केली.
मुंबई - मंत्रालयातील कनिष्ठ लिपिक असलेल्या अविनाश गलांडे याला लाच घेताना एसीबीने केली अटक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 6, 2019