आमचा धर्म स्वीकार, नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीन मुलीला धमकी, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 08:17 AM2023-06-17T08:17:41+5:302023-06-17T08:18:15+5:30

भाईंदरची घटना, मुन्नवर अन्सारी आणि अजीम मन्सुरी गजाआड

Accept our religion or be shot Minor girl gets threatened by two later arrested | आमचा धर्म स्वीकार, नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीन मुलीला धमकी, दोघांना अटक

आमचा धर्म स्वीकार, नाहीतर गोळ्या घालीन; अल्पवयीन मुलीला धमकी, दोघांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, भाईंदर: अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिला आमचा धर्म स्वीकार नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी देण्यात आल्याचे उघड झाले. तिला नकली बंदुकीने धमकावण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पीडित १३ वर्षीय मुलगी भाईंदरला राहते. मुनव्वर मन्सुरी याने १२ जूनला रात्री साडेआठच्यासुमारास मुलीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन  बुरखा, चेन आणि अंगठी देत बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये, आपण पळून जाऊन लग्न करू, असे त्या मुलीला सांगितले होते, मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून, तू बुरखा घालून आमचा धर्म कबूल केला नाहीस, तर तुला गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला. आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी मुन्नवर अन्सारी (वय २०) आणि अजीम मन्सुरी (१८) या दोघांना विनयभंगाच्या कलम ३५४, ३५४ (अ) ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली.

 

Web Title: Accept our religion or be shot Minor girl gets threatened by two later arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.