बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी स्वीकारली लाच

By शेखर पानसरे | Published: April 22, 2023 03:23 PM2023-04-22T15:23:05+5:302023-04-22T15:23:23+5:30

या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Accepted bribe to create separate Satbara of non-agricultural sector, sangamner | बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी स्वीकारली लाच

बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी स्वीकारली लाच

googlenewsNext

संगमनेर : बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तलाठ्याने संबंधिताकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर तलाठ्यासाठी ३६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या तरुणासह, लाचेची मागणी करणारा तलाठी अशा दोघांना शुक्रवारी (दि.२१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धनराज राठोड (वय ४०, तलाठी चिखली, ता. संगमनेर), योगेश काशिद (वय ३३, रा. घुलेवाडी फाटा, संगमनेर) अशी या दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांचे वडील व इतर ११ जणांच्या नावे तालुक्यातील मंगळापूर येथे जमीन आहे. त्या बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तलाठी राठोड याने तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड होऊन ३६ हजार स्वीकारण्याचे तलाठी राठोड याने मान्य केले. 

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 

Web Title: Accepted bribe to create separate Satbara of non-agricultural sector, sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.