चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:11 AM2018-11-23T11:11:23+5:302018-11-23T11:28:51+5:30

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

accident happened on university road Due to lose control of driver; One death, 4 injured | चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी 

ठळक मुद्देगुरुवारी रात्री घडली घटना; अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ रस्त्यावर कस्तुरबा चौकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ओलांडून ही कार औंधकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले. प्रतीक प्रमोद राम शेट्टीवार (वय 29 ) व राहुल रामचंद्र नायर (वय 28 रा. हरी ओम सोसायटी, औंध ) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मोटारीतील सर्वे दिल्ली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.


मिळालेल्या माहितीनुसार,  मोटार ही शिवाजीनगरबाजूला जात होती. मोटार ही कस्तुरबा चौकात आल्यावर अचानक गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे गाडी ही डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हलरला जाऊन धडकली. दोन्ही गाड्यांचा वेग हा जास्त होता. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना औंध येथील एम्स रुग्णालयात दाखल केले. 
अपघानानंतर औंधकडे जाणारी वाहतूक काही काही काळ थांबवण्यात आली होती. घटनास्थळी चतु:श्रृंगी पोलिसांनी वेळेवर दाखल होत इतर रुग्णांना दवाखात दखल केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.

Web Title: accident happened on university road Due to lose control of driver; One death, 4 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.