लग्नाचा वाढदिवस साजरा करुन येताना झाला अपघात; एकाच घरातील तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:59 PM2021-12-27T20:59:20+5:302021-12-27T21:33:33+5:30

Accident Case : रविवारी रात्री ते लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी वरुन ट्रिपल सीट भिंवडी येथे जेवण्यासाठी गेले होते. 

Accident happened while returning after celebrating wedding anniversary; Three died in the same family | लग्नाचा वाढदिवस साजरा करुन येताना झाला अपघात; एकाच घरातील तिघांचा मृत्यू

लग्नाचा वाढदिवस साजरा करुन येताना झाला अपघात; एकाच घरातील तिघांचा मृत्यू

Next

कुमार बडदे

मुंब्राः लग्नाच्या वाढदिवस साजरा करुन परत येताना झालेल्या भीषण अपघातामध्ये रामविरमा परीहार त्याची पत्नी मिनू आणि मेव्हणा हेमराज भाटी यांचा मृत्यू झाला. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे मुंब्र्यात हळहळ व्यक्त होत आहे. तिघे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील गोदावरी अपार्टमेंट या इमारतीमध्ये रहात होते,तसेच ते तिघ वैद्यकिय क्षेत्राशी संबधित होते. रविवारी रात्री ते लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी वरुन ट्रिपल सीट भिंवडी येथे जेवण्यासाठी गेले होते. 

सूत्रांनी दिलेल्या मध्यरात्री ते तेथून परत येत असताना भिंवडी बायपास रस्त्यावर त्यांच्या पुढे चालणा-या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी वाहनाला धडकली. त्याचवेळी मागून आलेल्या अन्य एका वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे संतुलन बिघडल्याने तिघेजण रस्त्यावर पडले. यात गंभीर  जखमी झालेल्या हेमराज आणि रामविरमा यांचा घटनास्थळी तर मीनूचा उपचारादरम्यान ठाण्यातील खाजगी रुग्णालयात सोमवारी सकाळी मृत्यू झाला. परीहार कुंटुंबातील एकुलत्या मुलासह त्याची पत्नी आणि भाटीया कुटुंबातीलही एकुलत्या एक मुलाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून,या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल मुंब्र्यात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह शववाहिकेमधून राजस्थान राज्यातील पाली येथील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

Web Title: Accident happened while returning after celebrating wedding anniversary; Three died in the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.