Accident in Karnataka: बस उलटून आठ जणांचा मृत्यू, २० जखमी; कर्नाटकमध्ये भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:52 AM2022-03-19T11:52:13+5:302022-03-19T11:52:46+5:30
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने हॉ़स्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ६० हून अधिक लोक प्रवास करत होते.
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने हॉ़स्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Karnataka | Eight dead and more than 20 critically injured including students as a bus overturned near Pavagada in Tumkur district: Tumkur Police
— ANI (@ANI) March 19, 2022
Further details awaited. pic.twitter.com/9fNqWD1r6T