Accident News: माय गेली, अर्भक जगले! डोळ्यात अश्रू आणणारा अपघात; मन हेलावणारा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:09 AM2022-07-21T11:09:17+5:302022-07-21T11:10:39+5:30
एक कार विरुद्ध दिशेने येत होती. त्यामुळे तिच्या पतीने बाईक थांबविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक मन हेलावणारा अपघात घडला आहे. ट्रकखाली एक गर्भवती महिला सापडली. तिचे पोट फाटून अर्भक बाहेर आले. प्रत्यक्षजदर्शींनी हे जेव्हा पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, पण तिच्या गर्भातून बाहेर पडलेले अर्भक सुस्थितीत होते. या चमत्कारीक परंतू तेवढ्यात वाईट घटनेने अनेकांचे मन हेलावले.
या अर्भकाला फिरोजाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बरतारा गावामध्ये हा अपघात झाला आहे. पती-पत्नी मोटारसायकलवरून जात होते. यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते ट्रकखाली आले. ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचे पोट फाटले आणि मूल बाहेर पडले. ते रडायला लागले म्हणून लोकांनी आवाज ऐकून तिकडे धाव घेतली.
महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे लोकांनी मुलाला उचलून तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासले असता ते ठीक असल्याचे दिसले. त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. महिलेचे गर्भाशय फाटल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पतीसोबत ती तिच्या माहेरी जात होती. तेव्हा हा अपघात झाला आहे.
एक कार विरुद्ध दिशेने येत होती. त्यामुळे तिच्या पतीने बाईक थांबविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावेळी महिला खाली पडली, तेव्हा मागून येत असलेल्या ट्रकच्या चाकाखाली आली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.