Accident: दुचाकींच्या धडकेत एकजण मृत्युमुखी, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:57 IST2022-08-18T17:57:32+5:302022-08-18T17:57:53+5:30
Accident: तिरोडा तालुक्यातील वडेगाव-भजेपार रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार, तीनजण जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) दुपारी ही घटना घडली असून, अविनाश श्रीपत लठया (२५) असे मृताचे नाव आहे.

Accident: दुचाकींच्या धडकेत एकजण मृत्युमुखी, तिघे जखमी
तिरोडा - तालुक्यातील वडेगाव-भजेपार रस्त्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार, तीनजण जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) दुपारी ही घटना घडली असून, अविनाश श्रीपत लठया (२५) असे मृताचे नाव आहे.
भजेपार रस्त्यावर राजेश कावळे यांच्या शेताजवळील मोडीवर दोन दुचाकी आपसात धडकल्या. यामध्ये अविनाश लठया, जयदेव येवतकर (४५), मचेल येवतकर (४७), जयदेव यांची बहीण व मुलगा शुभम जयदेव येवतकर (२२) गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताना अविनाश लठया यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.