सरपंच पदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘त्याने’ रचला अपघाताचा कट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 09:39 PM2019-03-19T21:39:35+5:302019-03-19T21:41:50+5:30

नऱ्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.

accident plan due to loss in sarpanch election loss | सरपंच पदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘त्याने’ रचला अपघाताचा कट 

सरपंच पदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘त्याने’ रचला अपघाताचा कट 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली दोघांना अटक : नऱ्हे ग्रामपंचायत सरपंच पद निवडणूक

पुणे : नऱ्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा कट करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. 
अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा़. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हे ) आणि नितीश सतीश थोपटे (वय ३०, रा़. थोपटे बिल्डिंग, धायरी) अशी त्यांची नावे आहेत़. 
ही घटना मुंबई -बंगलुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला ओमकार लॉजजवळ १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली होती़. अपघातात बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा़.नऱ्हे ) हे गंभीर जखमी झाले आहेत़. त्यांच्या डोक्याला मार लागला असून हातपायाला गंभीर जखमा झाल्या आहेत़. त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़.
पोलिसांनी सांगितले की, बाळासाहेब वनशिव हे नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती आहेत़ ते व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर हे १३ मार्चला सकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते़ आंबेगाव खुर्द येथील सर्व्हिस रोडने ते जात असताना एक पांढऱ्या रंगाची कार दोन ते तीन वेळा त्यांच्या बाजूने फिरुन गेली होती़. व्यायाम करुन ते परत येत असताना सर्व्हिस रोडच्या कडेने ते जात होते़. तेव्हा मागून आलेल्या कारने वनशिव यांना जोरात धडक दिली व ती कार वेगाने निघून गेली़ टिळेकर व वनशिव यांच्या नातेवाईकांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़. 
सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी अविनाश कांबळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता़. या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक फौजदार प्रदीप गुरव व पोलीस शिपाई जगदीश खेडेकर यांना कांबळे व थोपटे हे दोघे कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़. त्यांचा मित्र रोहीत पवार (रा़. नऱ्हे ) याची कार घेऊन गुन्हा केल्याचे सांगितले़. 
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, सहायक उपनिरीक्षक प्रदीप गुरव, हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांनी केली़. 
............
बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी मिनाक्षी यांनी अविनाश कांबळे यांच्या पत्नी रेश्मा कांबळे यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव केला होता़. त्याचा राग मनात धरुन त्यांनी वनशिव यांच्या अंगावर गाडी घालून अपघाताचा बनाव करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला़. भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.

Web Title: accident plan due to loss in sarpanch election loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.