Accident : कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:52 IST2022-07-24T18:51:41+5:302022-07-24T18:52:14+5:30
Accident Case : यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे.

Accident : कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
मंगेश कराळे
नालासोपारा :- विरारच्या राईपाडा येथील गोकुळवाडीच्या मुख्य रस्त्यावर रविवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. इर्टीगा कारचालक याचा भरधाव वेगातील वाहनांवरील ताबा सुटल्याने ती झाडावर जाऊन आदळल्याने अपघात घडला आहे.
यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी रुग्णालयात उपचार घेत आहे. जतीन पाटील आणि दिनेश मर्चंडे या दोघांचा अपघात मृत्यू झाल्याने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.