Accident: नव्याकोऱ्या कारमधील प्रवास ठरला अखेरचा, तीन सख्या भावांसह ५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:28 PM2022-05-19T16:28:07+5:302022-05-19T16:28:46+5:30

Accident News: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला.

Accident: The journey in the new car was the last, 5 people including 3 brothers died | Accident: नव्याकोऱ्या कारमधील प्रवास ठरला अखेरचा, तीन सख्या भावांसह ५ जणांचा मृत्यू 

Accident: नव्याकोऱ्या कारमधील प्रवास ठरला अखेरचा, तीन सख्या भावांसह ५ जणांचा मृत्यू 

Next

जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये नवी कार घेऊन कुटुंबीयांना न सांगता फिरायला गेलेलेल्या तीन सख्खा भावांसह पाच तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील एका तरुणाचा आठवडाभरापूर्वीच विवाह झाला होता. अपघाताची माहिती समजताच मृतांच्या घरी शोकाकूल वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मृतदेहांचा पोस्टमार्टेम करून ते कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. या अपघातात या युवकांच्या कारवर आदळलेल्या बोलेरोमधील चार जण जखमी झाले आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर सिंह यांनी सांगितले की, हा भीषण अपघात जिल्ह्याती बरखेडा गावामध्ये बुधवारी रात्री झाला. तिथे एक कार आणि बोलेरो यांच्यात जोरदार टक्कर झाली. कारमध्ये पाच जण तर बोलेरोमध्ये चार जण होते. अपघातात सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान, पहाडी येथून गोपालगडला जात असलेल्या एएसआय बाबूलाल मीणा यांनी जखमींना पाहिले. त्यांनी त्यांना पहाडी सीएचसीमध्ये नेऊन दाखल केले. त्यानंतर पोलिसांनीही रुग्णालयात धाव घेतली.

उपचारादरम्यान, कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाचही मृतांच्या मृतदेहांचं पहाडी येथील आरोग्य केंद्रावर पोस्टमार्टेम करून ते नातेवाईकांकडे सुपुर्द केले. मृतांमधील तिघे तरुण सख्खे भाऊ होते. तर चौथा मामेभाऊ आणि पाचवा त्यांचा भाचा होता. सर्व तरुणांचं वय हे १७ ते २५ दरम्यान होते. मृतांमधील अरबाज, परवेज, आणि वासिम हे सख्खे भाऊ होते. आलम हा त्यांच्या मामाचा मुलगा तर आशिक सख्ख्या बहिणीचा मुलगा होता.  

Web Title: Accident: The journey in the new car was the last, 5 people including 3 brothers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.