Accident: दोन मोटारींची धडक होऊन भीषण अपघात; पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी, ७ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:36 PM2022-04-18T15:36:53+5:302022-04-18T15:37:16+5:30

Accident: नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला

Accident: Two cars collided; Five-year-old boy killed, seven injured | Accident: दोन मोटारींची धडक होऊन भीषण अपघात; पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी, ७ जण जखमी

Accident: दोन मोटारींची धडक होऊन भीषण अपघात; पाच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी, ७ जण जखमी

googlenewsNext

नाशिक -  शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृत मुलगा व जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नव्हती. महिंद्रा झायलो कार (एम.एच15 डी सी 9746) व मारुती ब्रिझा (एम.एच.15 जी एल 3461) या दोन्ही मोटारीची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की चौकाच्या मधोमध  दोन्ही मोटारी उलटल्या आणि त्यामधील  प्रवासी बाहेर फेकले गेले. जखमींमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस तसेच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने घटनास्थळावरून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले जखमींमध्ये काहींच्या डोक्याला हातापायांना जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षामध्ये उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले

Web Title: Accident: Two cars collided; Five-year-old boy killed, seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.