Accident Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:55 AM2022-08-08T10:55:19+5:302022-08-08T10:56:58+5:30

Video ट्रकने कारला धडक दिल्यानंतरही ट्रक बंद करण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Accident Video: Samajwadi Party district president's car rammed for half a kilometer, truck driver in police custody in mainpuri UP | Accident Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले

Accident Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले

Next

लखनौ -  उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथे एका ट्रकचालकाने कारला जोरदार धडक दिली, त्यानंतर त्या कारला अर्धा किलोमीटरपर्यंत रेटत नेल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे ही कार युपीत विपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला असून गर्दीच्या ठिकाणाहून ट्रकने कारला 500 मीटरपर्यंत रेटत पुढे नेल्याचे दिसून येते. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे. 

ट्रकने कारला धडक दिल्यानंतरही ट्रक बंद करण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच, ट्रकच्या पाठीमागेही अनेकांनी धाव गेतल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. पुढे जाऊन ट्रक थांबल्यानंतर लोकांनी कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं. त्यावेळी, ही कार सपाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यांची असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. ट्रक ड्रायव्हर इटावाचा रहिवाशी असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे. 


याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यांच्याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही, असे मैनपुरीचे एसपी कमलेश दीक्षित यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.  
 

Web Title: Accident Video: Samajwadi Party district president's car rammed for half a kilometer, truck driver in police custody in mainpuri UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.