सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:26 IST2022-02-28T21:26:05+5:302022-02-28T21:26:40+5:30
Accident Case : लातूर-नांदेड महामार्गावर घडली घटना

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार
चाकूर (जि. लातूर) : दुचाकी आणि कारचा राष्ट्रीय महामार्गावरील येथील कृषी महाविद्यालयासमोर सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जवळपास १५ फूट उंच उडून कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रजनीकांत ज्ञानोबा कांबळे (२९, रा. डोंग्रज, ता. चाकूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील डोंग्रज येथील रजनीकांत कांबळे हा दुचाकी(एमएच २४, एव्ही ८३७३) वरून सोमवारी दुपारी जात होता. तेव्हा त्याची दुचाकी आणि कार (एमएच २४, एडब्ल्यू ३६११) चा येथील कृषी महाविद्यालयासमोर भीषण अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रजनीकांत यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.