अपघातावेळी मदतीसाठी धावून आले! कॉमेडियन अली असगरने केले पायधुनी पोलिसांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:32 PM2019-03-14T19:32:58+5:302019-03-14T19:34:51+5:30
विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रसंगावधान राखत सहाकार्य केले.
मुंबई - अभिनेता आणि कॉमेडियन अली असगर यांनी पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील आणि त्यांच्या पथकाचे ट्विटरवर आभार व्यक्त केले. कारण अली यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर पायधुनी पोलिसांकडून मोलाचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रसंगावधान राखत सहाकार्य केले. त्यासाठी त्यांचा ऋणी आहे, असे अली यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
कॉमेडियन अली असगर यांची होंडा सिटी कार मोहम्मद अली मार्गावरील सिग्नलजवळ थांबली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने अली असगर यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर अली असगर यांची कार पुढे उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले. अपघातादरम्यान, अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील हे पोलीस पथकासह अपघातस्थळी दाखल झाले. वेळ न दवडता त्यांनी तात्काळ मदत केली आणि अली यांना सहकार्य केले. या अपघातातून सावरल्यानंतर अली असगर यांनी ट्विटरवर पोलीस उपनिरीक्षक लिलाधर पाटील आणि पायधुनी पोलिसांचे आभार प्रकट केले.
Just wanted to Thank Pydhonie Police Station..specially PSI Liladhar Patil for being warm understanding & helpful-my car met wit an accident but the way he handled the Situation is greatly Appreciated..Thank you PSI Patil ..Thank you @MumbaiPolice -Salute 👏🙏
— Ali Asgar (@kingaliasgar) March 11, 2019