पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:56 PM2020-07-22T20:56:07+5:302020-07-22T20:57:25+5:30
शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात पकडलेली बस सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेणाºयास बिबवेवाडी पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे.
सुखदेव भिमदान चारण (वय ३७, रा. काकडे वस्ती, कोंढवा,मुळ गाव राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २४, रा.रघुवंशन अपार्टमेंट, नांदेड गाव) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार सुखसागरनगर येथील आंबामाता मंदिराजवळ १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडला होता़. चारण याने पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुरलीधर खोकले यांच्या सांगण्यावरुन ५० हजार रुपये घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबतची माहिती अशी, राज पुरोहित यांचा मित्र मनोहर सिंह याच्या मालकीची राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बस आहे. शहरात लॉकडाऊन असताना संचारबंदीमध्ये बिबवेवाडी पोलिसांनी ती पकडली होती. त्यावेळी चारण हा राजपुरोहत यांना भेटला. त्याने पोलीस अधिकाºयांच्या मदतीने बस सोडून देतो,असे सांगून १४ जुलै रोजी बसचालकाकडून ५० हजार रुपये घेतले. दरम्यान, तीन दिवसांनी १७ जुलै रोजी ही रक्कम त्याने चालकाला परत केली. ही माहिती वरिष्ठ पोलिसांना समजल्यानंतर चौकशी सुरु झाली. त्यात चारण याने संतोष लड्डा याच्या ओळखीने पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी बस सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्यावरुन चारण याने ही रक्कम घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर चारण याला पोलिसांनी अटक केली.
चारण याला बुधवारी न्यायालयात हजर केले.चारण याच्या मदतीने पोलीस निरीक्षक खोकले यांच्याकडे तपास करायचा आहे. संतोष गड्डा याने आरोपीची मुरलीधर खोकले यांच्याबरोबर ओळख करुन दिल्याचे तपास आढळून आले़ त्यामुळे संतोष गड्डा याच्याकडे तपास करायचा आहे़ राजलक्ष्मी ट्रॅव्हल्स बसचे चालक अरविंद गोस्वामी यांनी आरोपीला पैसे देताना कोण हजर होते, त्याचा तपास करायचा आहे. आरोपीने ५० हजार रुपये ३ हजार रुपये स्वत: कडे का ठेवले, याची चौकशी करायची आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व इतर संशयितांचे मोबाईलचे सीडीआर प्राप्त करुन त्याची पडताळणी करुन आरोपी व संशयितांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली़ न्यायालयाने आरोपीला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे अधिक तपास करीत आहेत.
..........
या प्रकरणातील आरोपीचे हे सांगणे आहे. त्याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे़ पोलीस निरीक्षक खोकले हे आज सुट्टीवर गेले आहेत. आम्ही चौकशी करुन जो पुरावा समोर येईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
सुहास बावचे, पोलीस उपायुक्त.