बलात्कार करुन आत्महत्येस प्रवृत्त केले, दहा वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 09:09 PM2022-10-02T21:09:20+5:302022-10-02T21:09:40+5:30
गुन्हे शाखा, युनिट ३ ची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- पीडित तरुणीवर बलात्कार केल्यावर कोणाला काही सांगितल्यावर एमएमएस दाखवेल अशी धमकी देत शिवीगाळ मारहाण केली. पीडित तरुणीने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याने मयत झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून मागील १० वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला शनिवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास व चौकशीसाठी आरोपीला नालासोपारा पोलिसांना ताबा देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गंभीर गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपीतांची शोध मोहिम राबविणेबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यवाही करीत असताना, १४ फेब्रुवारी ते २० एप्रिल २०१३ साली आरोपी सुलतान ऊर्फ राजा शेख याने १९ वर्षीय पीडित तरुणीला शीतपेयातून गुंगीकारक औषध पिण्यास देवुन ती बेशुध्द अवस्थेत असताना तिचेवर बलात्कार केला होता. त्यामुळे ती गरोदर राहिल्याने तिने सदरची माहिती आरोपीला सांगितले. आरोपीने तिला इतर कोणाला काही सांगितले तर तुझा एमएमएस सर्वांना दाखवेल अशी धमकी देवुन मारहाण व शिवीगाळी केली होती. सदर घटनेमुळे पीडित मुलीने भीतीपोटी अंगावर रॉकेल टाकुन स्व:तास पेटवुन घेतल्याने ती मयत झाली होती. नालासोपारा पोलिसांनी २२ एप्रिल २०१३ मध्ये वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.
सदर गुन्हयातील आरोपीत सुलतान ऊर्फ राजा शेख (२९) याच्याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे शोध घेवून शनिवारी ताब्यात घेतले. त्याचेकडे प्राथमिक तपास केला असता त्याने तो मागील ९ वर्षापासुन उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल येथे अस्तित्व लपवुन दडुुन राहत असल्याचे सांगितले. आरोपीला पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलिसांना ताबा दिला आहे.