नोकरीचे आमिष देऊन महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:39 PM2018-07-07T14:39:27+5:302018-07-07T14:46:21+5:30
अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.
अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शिवाजी नगरात राहणाºया ममता सुभाष दुरतकर (३३) यांच्या तक्रारीनुसार ७ जानेवारी २0१७ रोजी त्यांनी शाहिन डॉट कॉम संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात पाहिली. त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. काही दिवसात त्यांना नोकरीसाठी निवड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील विकास मनोज सक्सेना (३९) याने फोन करून नोकरीसाठी ममता दुरतकर यांना त्याच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर दुरतकर यांनी त्याच्या खात्यात ९ हजार ४७0 रुपये जमा केले. काही दिवस उलटल्यानंतरही विकास सक्सेना याच्यासोबत संपर्क होत नसल्याने, ममता दुरतकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीनुसार २९ मार्च २0१७ रोजी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२0, ५0६, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपी विकास सक्सेना हा उत्तर प्रदेशातील गाजियाबादचा राहणारा असल्याचे समोर आले. पोलिसांनी पथक पाठवून त्याला अटक करून शुक्रवारी सकाळी अकोल्यात आणले. पुढील तपास ठाणेदार अन्वर शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)