पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:05 PM2020-03-04T22:05:01+5:302020-03-04T22:07:25+5:30

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केली होती हत्या

The 'accused' arrested by mahatma phule police was sentenced to death pda | पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा

पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आरोपीला फाशीची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे दुमकाचे पोलीस अधीक्षक रमेश यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत ज्या ट्रेन मध्ये आरोपी बसला होता ती ट्रेन २० मिनिटात कल्याण स्टेशनला पोहचणार असल्याची माहिती दिली.घटनेच्या २४ दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

कल्याण : महात्मा फुले पोलिसांनी पकडलेल्या ६ वर्षीय चिमुकलीवर सामुहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला दुमका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटात फोटोच्या आधारे आरोपी मिठू राय याला अटक केली. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व.पो.नि. प्रकाश लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले आहे.
 

झारखंडच्या दुमका जिल्ह्यात असलेल्या रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षीय अल्पवयीन चिमुकालीवर तिच्या एका नातेवाईकाने आपल्या मित्रांसोबत सामुहिक बलात्कार केला होता आणि तिची हत्या करून एका जागेत तिचा मुतदेह पुरला होता. अखेर मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला मात्र या प्रकरणाचा मुख्य आरोपी मिठू राय हा फरार झाला होता. मिठू हा मुंबईच्या दिशेने पळाला असल्याची माहिती दुमका पोलिसांना  मिळाली. दुमकाचे पोलीस अधीक्षक रमेश यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत ज्या ट्रेन मध्ये आरोपी बसला होता ती ट्रेन २० मिनिटात कल्याण स्टेशनला पोहचणार असल्याची माहिती दिली.

पोलिसांकडे अवघ्या २० मिनिटांचा कालावधी असल्याने तत्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक कल्याण स्टेशनला रवाना झाले आणि मिळालेल्या फोटोच्या आधारे आरोपीला अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत मिठू राय याला पकडले. या फरार असलेल्या मुख्य आरोपीला पकडत त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे साथीदार पंकज मोहाली आणि अशोक राय या दोघांचा नाव पत्ता सुद्धा दुमका पोलिसांना देण्यात आला.

घटनेच्या २४ दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांमुळे हे शक्य झाले असून या गुन्ह्यात आरोपीला पकडून त्याच्या साथीदारांचा छडा लावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सत्कार करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Web Title: The 'accused' arrested by mahatma phule police was sentenced to death pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.