कुंपणाच्या वादात वृद्धाचा कुऱ्हाडीने खून, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 11:17 IST2020-11-07T11:16:36+5:302020-11-07T11:17:03+5:30
crime News : कुंपणाच्या जागेच्या वादातून कुऱ्हाडीने मानेवर वार करून वृद्धाचा खून करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

कुंपणाच्या वादात वृद्धाचा कुऱ्हाडीने खून, आरोपीस अटक
भंडारा - तुमसर तालुक्यातील राजापूर येथे कुंपणाच्या जागेच्या वादातून कुऱ्हाडीने मानेवर वार करून वृद्धाचा खून करण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. जोशीराम दावजी भलावी (६५) रा. राजापूर असे मृताचे नाव आहे. तर सुधीर महागु वरकडे (५०) रा. राजापूर असे आरोपीचे नाव आहे.
दोघांची घरे लगून असून, कुंपणाच्या वादावरून नेहमी दोघांत शाब्दिक बाचाबाची व्हायची. शुक्रवारी सकाळी या दोघांत भांडण झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी सुधीर जोशीरामवर पाळत ठेवून होता. रात्री जोशीराम घरी येत असताना सुधीरने अंधाराचा फायदा घेत त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले आणि तेथून पसार झाला. जखमी जोशीरामला उपचारासाठी भंडारा येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी सुधीर याला पोलिसांनी अटक केली. तपास गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.