अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 03:33 PM2019-08-21T15:33:38+5:302019-08-21T15:34:51+5:30

या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत.

Accused arrested; open 14 house breaking and 10 chain snatching cases | अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड 

अट्टल चोरांना बेड्या; घरफोडीचे १४ तर सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघड 

googlenewsNext
ठळक मुद्दे या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ६ अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकलसह २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

कल्याण - महात्मा फुले चौक पोलिसांनी घरफोडीचे सुमारे १४ तर अँटी रॉबरी स्कॉडने चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ६ अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या महिन्यात पश्चिमेतील ठाणगेवाडी परिसरात असणाऱ्या मेडकीलच्या दुकानात चोरी झाली होती. दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २ मोबाईल आणि रोकड चोरली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना महात्मा फुले चौक पोलिसांच्या हाती पप्पू सुंदर यादव, आकाश रमेश गोरे, दत्ता पाटील आणि दत्ता माटेकर ही चौकडी लागली.
किराणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, स्वीट मार्ट, कपड्याचे दुकानांचे शटर उचकटून हे आरोपी चोरी करत असल्याचे त्यांच्या तपासात समोर आले.  या चौघांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात ३, हिललाईनमध्ये ५, विठ्ठलवाडी २, कोळसेवाडी २, मानपाडा आणि नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात २ असे १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.ए.नांद्रे, हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, चौधरी, भालेराव, चित्ते, भणगे, दळवी आणि पोलीस शिपाई पवार या पथकाने केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकलसह २ लाख ४१ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परिमंडळ ३ च्या अँटी रॉबरी स्कॉडने २ इराणी आरोपींना अटक केली असून चैन स्नॅचिंगचे ७ आणि वाहन चोरीचे ३ असे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. काही दिवसांपूर्वी अँटी रॉबरी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीतून कासीम अफसर इराणी याला अटक केली. त्याच्या तपासात कासीमने चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली देत या वस्तू विकणाऱ्या फिरोज सरवर इराणीचीही माहिती दिली.
त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाणे २, महात्मा फुले १, कोळसेवाडी २, टिळकनगर १, डोंबिवली १, मुंब्रा १, विठ्ठलवाडी १ आणि खडकपाडा १ असे १० गुन्हे दाखल आहेत. तसेच हा आरोपी ठाणे पोलिसांच्या टॉप २० चैन स्नॅचरच्या यादीतील वॉन्टेड गुन्हेगार असल्याचेही पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यामध्ये तो सध्या जामिनावर सुटला असून त्याची आई, २ भाऊ, बहिणीही या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
ही कारवाई अँटी रॉबरी स्कॉडचे उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दिपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, हृषिकेश भालेराव, शिपाई रविंद्र हासे,  चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने केली. या इराणी आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ महागड्या मोटरसायकलही हस्तगत केल्या आहेत.

 

Web Title: Accused arrested; open 14 house breaking and 10 chain snatching cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.